Author Topic: मन  (Read 2660 times)

Offline kalpij1

 • Newbie
 • *
 • Posts: 13
मन
« on: October 13, 2009, 10:19:48 PM »
मन वेडं कोकरू
त्याला किती गोंजारु
मनाच्या तालात
मी राहते नादात

मनाच्याही पार
एक आत्मा राहतो .
त्याची माझी ओळख
होऊ देई ना ,मन

माझ्या आत्म्यात
नांदतो विठुच राउळ
मन आडवे मला
भेटण्या विठुला

ही संसाराची ओढ़
का टूटता तुटेना
या मनाचा खेळ
नाही थांबता थांबेना
कल्पी जोशी १३/०३/2009

.........................................................................

मन अथांग अथांग
मन अथांग अथांग
लागे कुणास थांग
मनातल्या नभात
कीडे विषारी धावत

घरी आरसा बोलला
माझ्या चेहरयाचे भाव
आताशा तोही का
वाटतो बाटलेला ??

आपले डोळेच झाले
कसे फितूर आताशा
माझी नजरच मला
दाखवी गं वाकुल्या

माझ्या घरात मन
माझं ग रमेना
माझ्या मनाचाच शोध
मला लागता लागेना
कल्पी जोशी ०३/०३/2009
..............................................

मन गुंतले निसर्गी या ...
मन गुंतले निसर्गी या ...
हळूच बोलले मी मलाच ..
कोण ग या साम्राज्याचा धनि ,

ध्वनि उमटला नाद ब्रम्ही
घंटा वाजली दूर वारुळी...
पक्षी मग्न गीत गुन्जनी ....
हिरवागार निसर्ग बोले ...
पानाफुलात हवा दाटली...
बासुरिचे सुर् मनी विसावले ...
ओमकार मग कानी घुमला ...
मेघाला पण जाग आली..
बिजलिसम ती राधा नाचे ....
खेळ रंगला, नदितिरी विश्वेश्वराचा ...
क्रिश्नवर्नी मेघ गरजला ..
ओलिचिम्ब धरा झाली ...
पानोंपानी कृष्ण पाहिला ...
राधेचा हां श्याम बावरा
श्रीहरी माझा आज पाहिला
साम्राज्याचा शोध लागला...
कल्पी जोशी १०/०३/2009
.......................................................


मन माझे माझ्यावर
एकदा असेच रुसले
फुरगंटून गाल फुगवून
कोपर्यात जाऊन बसले

क्षण क्षण त्यावेळी
रीता रीता भासला
गीत मी तेव्हा
विरहाचे गायले

हिरवा रंग स्रुष्टीचा
फुलाफुलात इंद्रधनु
आनंदाची कारंजी
मी आपसुकच हसले

आणि काय चमत्कार
मन माझे झाले जागे
राग विसरून सारा
माझ्यासोबत ते ही हसले

मनासोबत मी ही
आनंदात न्हाले
हिरव्या हिरव्या
गालिचावर लोळून घेतले
आकाशाचे पांघरूण
अंगावर घेतले
चांदण्याचा प्रकाश
प्यायले मी
’चंद्राच्या प्रकाशात
न्हाऊन घेतले

उफाळत्या नदीत
मारल्या उसळ्या
लाटेवर लाटा
मनाच्या वाटा
धुऊन घेतल्या

मनाचे पारणे
मनाने फेडले
कल्पी जोशी २९/०६/२००९
..................................................

फक्त माझ्यासाठी
आज एकटेपणा खायला
उभा राहीलाय पुन्हा
आठवणीचा पसारा पसरून
राक्षशी जबडा पसरून
हतबल मी लाचार मी
असं वाटतं काय तूला

झोकून पण नाही देणार मी
तुझ्यात ...........
विसरेल तूला,
समोर सुंदर वर्तमान असतांना
का बघू मी मागे
असतील ना तूझ्या आठवणी
काय कामाच्या त्या
फक्त डोळ्यात आणतात पाणि
नकोय मला ते
ह्रुदयाच्या चिंध्या करायला

जखमा शिवून घेतल्याय मी
ओठावर हास्य
आता आता ..
तर फुलायला लागलय
बगिच्यातली फुलं मोहक दिसू लागली
आता आता.......
संगीताचा ठेका
नाचाचा ताल घ्यायला..शिकवतोय मला
आता आता.......
स्वप्न जवळ आली पुन्हा
कविता ताल धरतेय
आता आता.....
कुठशी.

मनात माझ्या जागाच नाही
आता तुझ्यासाठी
जगणार मी फक्त माझ्यासाठी
जगणार मी फक्त माझ्यासाठी
कल्पी जोशी२१/०५/२००९
.............................................................

रंगांची उधळन
अंगणी चमेली कुम्पनी विसावली
जास्वंदी लाली सुर्याला लाजवी

प्राजक्त माझा नाजुक फार
जखामांशी झेलुन उगाच कोमेजतो

रातराणी कुम्पनी सुंगंध आसमंती
संगीत मनी तारा झंकारती

गुलाबक्षी माझी रंगात न्हाते
रंगांची उधळन करताना गाते

अबोली कां गं बोलत नाही कुणाशी
स्फुंदत बसू नको काही तरी बोल गं

विचाराची आवर्तनं आवरते घे गं
तुही संगीत वाच ना गं

बगिच्यात माझ्या श्रुष्टिचा नाच
तूही त्यावर नाच ना गं

वाचतांना संगीत मनातल सांग
तुझ गुपित काय लागुदे थांग
कल्पी जोशी ११/०३/2009
............................................................

मन नाठाळ पाऊस
मन मनाचे साहस
दुरवर डोंगरात
मन अविनाशी भास

मन तुळ्शीचा दिवा
मन रात्रिचा काजवा
रातराणीचा सुगंध
गातो मनाचा पारवा
कल्पी जोशी
.........................................

मन दुखाचा भाला
मन सुखाचा शेला
जीवनाच्या उंबरठ्यात
मन स्वप्नांचाही किल्ला

मन उदास उदास
मन हास्य खास
आजवर आयुष्यात
मन लाख लाख भास
कल्पी जोशी
..........................................

मन दुखाच्या डागण्या
मन सुखाच्या वल्गना
संधीसाधु नियतीच्या
कधी जीवनी वंचना


मन चरखा फ़िरता
मन वारारे वाहता
वाहणारया वारयाचा
मन सर्व कर्मधर्ता
कल्पी जोशी
.............................................

कधी
कधी स्वर्गिय" वासना "
कधी नरक् "यातणा "


कधी निरोगि "मन "
कधी इन्गळ्या" रान "


कधी कापरे" थरथर "
कधी जादुई "तलवार "


कधी विश्वाचा" पसारा "
कधि मनीचा" फुलोरा "


कधी मनात "पावा "
कधी राणात "धावा "


कधि मनात" लाज "
कधी मैफिलित "गाज "


कधी पाउस" डॊळ्यात "
कधी पाउस " नभात"


कधी जिवाचा " वणवा "
कधी सुखाच्या "जाणीवा"
कल्पी जोशी १९/०४/२००९
............................................

मन पिसाट पिसाट
काय सांगु लाट
पापी वासना आतल्या
बांधे मनात घाट

मन निर्मळ निर्मळ
जसी अंगणी तुळस
दीप देव्हार्य़ात जळतो
त्याचा मनात प्रकाश

मनाचे लाख बहाणे
किती सांगु वर्णन
का कोणास सांगावे
माझ्या मनीचे उखाणे

कल्पी जोशी
« Last Edit: October 13, 2009, 11:09:46 PM by kalpij1 »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline madhura

 • Jr. Member
 • **
 • Posts: 271
 • Gender: Female
 • I am Simple
Re: मन
« Reply #1 on: November 05, 2009, 04:43:45 PM »
wow..!!!! khup ch chan ahe...even i have joined your community on orkut......i like your poems...


Offline vidya.thasal

 • Newbie
 • *
 • Posts: 5
Re: मन
« Reply #2 on: November 07, 2009, 02:29:23 PM »
chyan,surekha