काल ज़रा बघितलं आत ,
पूर्वीची "मी " दिसलीच नाही
कुठे हरवली ,काही कळलच नाही ,
पूर्वी कशी कळि सदा खुललेली
स्वप्नात झोके घेणारी ,
वाटेतली काटे वेचणारी,
फुलांची भाषा बोलणारी
चंचल ,"हरिणी "
कुठे हरवली काही कळलच नाही ..
आत डोकावली ,मी
दिसली कोपर्यात बसलेली ,
शांत नजर ,ना रुसवा चेहर्यावर
ना असूया ,ना क्रोध ...
किती मूर्ति ,सात्विक
माझी "मी "
मलाच आवडली ...!!
मी आत डोकावली .....
तसतसा मला शोध लागत गेला
माझ्या मनाचा तळ ...
मला गवसत राहिला ..
तरीही मला ...
परकेपना भासत गेला ..
माझा शोध चालूच आहे ..
माझ्यातला परकेपना संपेपर्यंत ..!!
सर्व विसरायचं .....
विलीन व्हायचं मला
तुझ्यात पूर्णपणे ...
जमेल काय मला ...
हे तुझ्यात सामावण....!!शुन्य होइपर्यन्त !!!
कल्पी जोशी १८/०४/2009