Author Topic: मासाहेब तुम्ही ग्रेट होता  (Read 1570 times)

Offline Pravin R. Kale

  • Newbie
  • *
  • Posts: 7
  • Gender: Male
मासाहेब तुम्ही ग्रेट होता
महाराष्ट्रासाठी अनमोल भेट होता
शिवबा घडवायला
तुम्ही कणखर होता
संभाजी घडवायला
तुम्ही सक्षम होता
मासाहेब तुम्ही ग्रेट होता

घडवला इतिहास तुम्ही
पण आज तो
विसरल्यासारख वागतो आम्ही
तुमच्या संस्काराचा प्याला
असा रिताच राहिला
तुमचा कणखर बाणाही
पाण्यासारखा वाहिला
इतिहासही तुमचा फक्त
मार्कापुरता राहिला

मावळ्यांच बलिदानही
चरणधुळीत मिसळल
वारसाही तुमचा
वादात विसरला

वाटत मासाहेब आज
तुम्ही हव्या होत्या
पुन्हा एकदा शेर शिवबा
छावा संभाजी घडवण्यासाठी
इथल्या आपल्यातल्याच
मोगलांना रडवण्यासाठी


Pravin R. Kale
8308793007

Marathi Kavita : मराठी कविता


Nandkishor Pathak

  • Guest
Khupach Sundar kavitaahe saheb....Manapasun manala Bhedali...