Author Topic: प्रेरणा :  (Read 3196 times)

Offline RS111

  • Newbie
  • *
  • Posts: 3
प्रेरणा :
« on: July 27, 2014, 08:40:13 PM »
अरे अरे माणसा , जगणे सोपे असते ,कोणाला शिकवावं  लागत नाही .
प्रयत्न सोडू नये तोवर ,जोवर  तहान भागत  नाही .
ज्याला बदलून टाकायचे असते जग , तो काही उगिच  जागत नाही .
कर्तुत्वावर ज्याला असतो विश्वास , तो देवाकडे सुद्धा काही मागत नाही .

सामान्य असतात ते , जे गर्दीत सहज हरवून जातात .
असामान्य असतात ते , जे एकटे असताना सुद्धा मानसं भरवून घेतात .
अरे जन्म सर्वच घेतात , श्वास घेऊन जगतात  .
काही फक्त टिकतात आणि यशाची देवाकडे भीक मागतात .

अरे बदलून जाईल  जग असे कर्म तू करावे .
कि भेटायचे आहे या मनुष्याला असे हट्ट  देवाने धरावे .
मेंढरांच्या कळपात अडकला असशील तर तुझा मार्ग शोधून काढ .
थोडसं  करून हवेत उडायचे पुरे झाले आता लाड .

एके दिवशी असा होईल कि माया थांबवेल तुझं  काम .
भगवानाचे तेव्हा आठवेल तुला नाम .
देवाला मग सांग " मला याहून कठिण  संकट देऊन जा ".
पण जाता जात मला मजबूत खांदे देऊन जा .

तेव्हाच तुझ्या मनगटात येईल डोंगराचे बळ  .
कुणीही त्रास दिला तरी वाटणार नाही चळ  .
 एवढे कष्ट केले त्याचे मिळणार नक्की फळ .

इच्छा  शक्तिच्या  ताकदीला कमी नको समजू काही .
चमत्कार होऊन जातिल  , तुला कळणार हि नाही .
एके दिवशी तुझ्या कीर्तीने  गरजू लागतील ढग .
मग काय सलामी देत तुला पाहत राहील जग .

                                                       

-- Rohit . S

Marathi Kavita : मराठी कविता