Author Topic: सचिन मी होणार  (Read 908 times)

Offline madhura

  • Jr. Member
  • **
  • Posts: 271
  • Gender: Female
  • I am Simple
सचिन मी होणार
« on: July 28, 2014, 10:11:57 AM »
सचिन मी होणार,
आई, सचिन मी होणार |
सवंगड्यांऩा सवे घेउनी, क्रिकेट मी खेळणार ||ध्रु.||

उंचावरुनी मारीन छक्के,
कुणी न झेली, ठाऊक पक्के,
धावांमागे जमवुनी धावा, डोंगर मी रचणार,
आई, सचिन मी होणार ||१||

आवड मजला चौकारांची,
ठोकीन शतके, मी धावांची,
आउट मजला करण्यासाठी, तारांबळ उडणार,
आई, सचिन मी होणार ||२||

धावांचे मी रचता किल्ले,
सोन्याचे मज मिळतील बिल्ले,
तरीही आई, मी न कधीही, गर्वाला शिवणार,
आई, सचिन मी होणार ||३||

देशोदेशी क्रिकेट खेळुनी,
ध्वजा यशाची उंच धरुनी,
भारतभूचे गौरव गाणे, आनंदे गाणार,
आई, सचिन मी होणार ||४||

कवी : उपेंद्र चिंचोरे

Marathi Kavita : मराठी कविता