Author Topic: दारु  (Read 1751 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
दारु
« on: August 20, 2014, 11:08:25 AM »
दारूची किमया हाय लय न्यारी
घेईल जो घोट होई कारभारी
पिऊन पडेल तो गटारी
आताड्यांसाठी करेल तो दवाखाण्यात वारी,
गावठीही आता विदेशीस भारी
विनापाण्याचा घोट हा हाय लई भारी
सडवुन आतडं तडफडुन मारी
एका-एकान येणार हाय सगळ्याची बारी,
सावकार येतोय रोजच दारी
बायका-पोरांची होते उपासमारी,
सोड ती दारु आता
आनंद येईल तुझ्या संसारी
..... S.S.More

Marathi Kavita : मराठी कविता