Author Topic: संसाराचा गाडा  (Read 1485 times)

Offline madhura

  • Jr. Member
  • **
  • Posts: 271
  • Gender: Female
  • I am Simple
संसाराचा गाडा
« on: August 23, 2014, 12:14:42 PM »
संसाराच्या गाड्यात सुरवातीला प्रेमच प्रेम
  नंतर मात्र सगळ्या संसारांच सेमच सेम !!
 
 संसाराचा गाडा सुरवातीला जरा कुरकुरतो
  सवयीन मात्र लोणच्यासारखा मुरतो !!
 
 संसाराच्या गाड्यात आधी "मी" पणाचा तोरा
  मुलाबाळांच्या जन्माने वाढतो "आपले" पणाचा नारा !!
 
 संसाराचा गाडा वाटतो दोन चाकांचा बरा
  दोन चाकांचाच राहिला तर वाटतो कोरा कोरा !!
 
 संसाराच्या गाड्याला ओढता ओढता थकायला होत
  मुलाबाळांच्या प्रगतीने हसायला येत !!

--जयंत

Marathi Kavita : मराठी कविता