Author Topic: सुधारता सुधारता हायात गेली तरी न कळला घोळ काही ||  (Read 1772 times)

Offline virat shinde

 • Jr. Member
 • **
 • Posts: 82
सुधारता सुधारता हायात गेली
तरी न कळला घोळ काही ||

धर्मा धर्मात वाद चढवले
गुलामगीरीचे काळोख ओढले
रूंदावली दरी गरिब-श्रिमंतीची
म्हणे हा बांडगूळ शुद्र आम्हा ||

सुधारता सुधारता हायात गेली
तरी न कळला घोळ काही ||

बहुजन उपाशी पंथ तुपाशी
हा कसलारे न्याय तुझा
दगडाच तु देव झाला
काय बोलेल तुझी वाचा ||

सुधारता सुधारता हायात गेली
तरी न कळला घोळ काही ||

शतजन्माचे बळीवंशज आम्ही
शिव दान हा धर्म आमुचा
सर्व लुटले चाटले भिकार्याने
तरीही म्हणतो यज्ञा तुंप लागे ||

सुधारता सुधारता हायात गेली
तरी न कळला घोळ काही ||

भाईबंद आप्त आमूचे
शोषणाने कुपोषित केले
शेंडी वाल्यांना ढेरगे सुटले
सरकारबी त्यांच्या खिशात बसले||

सुधारता सुधारता हायात गेली
तरी न कळला घोळ काही ||

काय रे देवा तुझा न्याय
तुझ्याच मंदिरात घोळ हाय
सगळे ईथे भ्रष्ट आण
सारा भ्रष्टाचारच हाय ||

सुधारता सुधारता हायात गेली
तरी न कळला घोळ काही
आता एवढीच विनंती हाय
माणुसकी साठी जगुन पहाय ||

✒लिखाण- विराट शिंदे...
                   (9673797996)
दि.-31/08/14

◆ झुंजार मराठा संघ ◆

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Pravin Raghunath Kale

 • Jr. Member
 • **
 • Posts: 115
 • Gender: Male
 • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
सुधारता सुधारता आयुष्य गेले
पण
सुधारणा काय असते तेच न कळल्याने
सुधारणा होऊ शकत नाही

अशी आमची परिस्थिती आहे

Offline virat shinde

 • Jr. Member
 • **
 • Posts: 82
धन्यवाद प्रविण