Author Topic: वाट चाललो मी यशाची  (Read 2790 times)

Offline dipakmuthe

  • Newbie
  • *
  • Posts: 7
वाट चाललो मी यशाची
« on: September 24, 2014, 05:45:41 PM »
वाट चाललो मी यशाची
चिंता नसे मज भूतकाळाची
साथ घेऊन वर्तमानाची
संधी साधायची भविष्याची
अशक्य मजला माहित नाही
शक्य ते सुटू देणार नाही
आहे वाट काटेरी परी
आता माघार मी घेणार नाही
साथ देणाऱ्याला सोबत घेईन
निंदकाचे आभार मानीन
निन्देविना त्याच्या मी
कुठे आहे हे कस पाहीन
वाट आहे काटेरी पण
कधी चालावे लागेल उन्हा पावसात
पण कमी नसेल माझ्या आत्मविश्वासात ,
थकतील पाय माझे
अन थकेल मनही तरीही
मी थकणार नाही.
शुल्लक गोष्टींपुढेआता मी झुकणार नाही .
मोडला माझा कणा तरी
शिखर यशाचे गाठल्या शिवाय
मागे फिरणार नाही .
सुखाने बेधुंध झाल्याशिवाय
आता मी थांबणार नाही .
दीपक मुठे

Marathi Kavita : मराठी कविता