Author Topic: आज मला पक्षी होवून आकाशात उडायचंय  (Read 2814 times)

Offline Kaustubh P. Wadate.

  • Newbie
  • *
  • Posts: 12
आज मला पक्षी होवून आकाशात उडायचंय

आज मला पक्षी होवून आकाशात उडायचंय
आशेच्या पंखानसवे उंच उंच जायचंय,
आज मला पक्षी होवून आकाशात उडायचंय.

सारे दिवस निराशेत फुकट गेले,
बंद खोलीत गुदमरून श्वास मेले,
त्याच बंद खोलीला आज तोडून टाकायचंय,
आज मला पक्षी होवून आकाशात उडायचंय.

रस्त्यात माझ्या खूप काटे होते,
चालताना हेच काटे टोचले होते,
त्याच काट्यांना पायाने चिरडून पुढे धावायचंय,
आज मला पक्षी होवून आकाशात उडायचंय.

लोकांनी मला शब्दांनी खूप मारले,
माझ्या मनात अपयशाच बीज पेरले,
त्याच लोकांना यश काय हे दाखवायचंय,
आज मला पक्षी होवून आकाशात उडायचंय.

-कौस्तुभ प्रकाश वाडते

Marathi Kavita : मराठी कविता


Prashant Wagh

  • Guest
Kavita khupch chaan ...khup prernadayi