Author Topic: शब्दांचे बोलणे.........  (Read 2247 times)

Offline dipak chandane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 68
शब्दांचे बोलणे.........
« on: October 06, 2014, 11:23:50 PM »
शब्द येती असे जणु कि,
भिरभिरणारे वारे,
बोलु लागती वेली, फुले,
आणि अाकाशातील तारे

मग, होऊन सारे बोलके
वाटे शब्द शब्द खेळती कारे
म्हणूणी का शिरते अंगात
शब्दांचेच ते वारे

मग, हळुच कानात कोण बोलती
नको शोधु शब्द येती कोठुनी
नको शब्दांचे किनारे
आम्ही देतो शब्द तुला
तू नुसतेच लिहित जारे
                              - दि.मा.चांदणे

Marathi Kavita : मराठी कविता