Author Topic: माझ्या मना रं तू...  (Read 1754 times)

Offline virat shinde

  • Jr. Member
  • **
  • Posts: 82
माझ्या मना रं तू...
« on: October 21, 2014, 11:37:37 PM »
माझ्या मना रं तू
घे जगण्याचा ठाव रं
अंधाराला सोडून तू
उजेडाकडे धाव रं   ||

मेहनत नावाच
आपल आहे गाव रं
नशिबाचे दोर तोडून
जगा बरोबर धाव रं  ||

कष्टाला फळ आहे
सोस जरा तू घाव रं
स्पर्धेत जर जिंकलास
तरच प्रगतीला वाव रं  ||

तत्वज्ञानातूनच मिळेल
जगण्याचा ठाव रं
ज्ञानाचा आविष्कारानं होईल
इतिहासात नाव रं    ||

आजच हे खुळ सोडून
मानवतेशी नात जोडा
उच्च-निच्चता सोडून
त्याला समते मध्ये मोडा  ||

      ✒कवी - विराट शिंदे
9673797996
« Last Edit: October 22, 2014, 11:48:13 AM by virat shinde »

Marathi Kavita : मराठी कविता