Author Topic: अस्तित्वाचा लढा  (Read 1932 times)

Offline Mangesh Kocharekar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 95
अस्तित्वाचा लढा
« on: October 24, 2014, 08:25:50 PM »
           अस्तित्वाचा  लढा
अस्तित्वाचा लढा मुन्गीसाठी अन माणसासाठी
अस्तित्वाचा लढा मुंगुसासाठी अन सापासाठी
अस्तित्वाचा लढा पोलीस, अन चोरांसाठी
आपण हेच तर शिकलो बळी तो कान पिळी
दुर्बलाच्या पडते काठी पाठी अन भाळी
  पण राजकीय अस्तित्वाची रीतच निराळी
  रात्रीत विणतात नव्या सोय्ररिकीची जाळी
  तत्वाना देतात चुटकीसरशी तिलांजली
   कधी गांधी टोपी,तर कधी गंध कपाळी

  एका रात्रीत लावतात स्वतःची बोली         
     मंगेश कोचरेकर

Marathi Kavita : मराठी कविता