Author Topic: रवि वार अन् सोमवार मधला गुंता  (Read 2239 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
रविवार  अन् सोमवार मधला
 गुंता मला कळला नाही !
जे जे रविवारी जमते
ते ते सोमवारी का नाही ? ! !

दारू अन् मटण खाता
रविवारी पोट भरून !
सोमवार आल्यावर बोलता
आज नाही, देवाचा वार म्हणून ! !

तेच पोट, तेच हात
तेच तोंड, तेच दात !
कधीही खाल्ले तरी जाते
त्याच पोटात ! !

रविवारी चालत कुणाच्याही उष्ट !
सोमवारी कसा होतो धर्म तुमचा भ्रष्ट ? ! !

धर्म पाळायचा असेल तर पाळा
तन मन धनाने !
खायायचेच असेल तर खा
मन मोकळे पणाने ! !

संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता


prashant morkar

  • Guest
रविवार अन् सोमवार मधला गुंता माझ्या मनालाही पडला आहे