Author Topic: स्री  (Read 1642 times)

Offline Shivangi

  • Newbie
  • *
  • Posts: 8
स्री
« on: November 26, 2014, 02:44:41 PM »
कधी ती एकटी , कधी ती उदास
न जाणो कसला असे तिला ध्यास …

कधी आतुर ती , कधी बेभान
कधी पावसाच्या सरीमध्ये भिजे तिचे मन ….

कधी सूर ती , कधी मौन
कधी मनकवडी ,  जाणे जीवाचा कौल …

कधी गंभीर समुद्र ती , कधी अवखळ झरा
कधी ओसरती नदी , कधी सुसाट वारा ….

कधी प्रेयसी ती, कधी पत्नी
कधी माता , तर कधी सती …

कधी बावरी ती , कधी चलाख
कधी लख्ख प्रकाश तर कधी काळोख

कधी खळखळ गीत , कधी राग मल्हार
कधी सौम्य ती कधी रुद्र , कधी जीत कधी हार ….

अबला नसे ती , पटवून घ्या खात्री
ती तर संपूर्ण जगाची  अधिष्ठात्री 

------- कल्याणी




Marathi Kavita : मराठी कविता

स्री
« on: November 26, 2014, 02:44:41 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले एक किती ? (answer in English number):