Author Topic: आज मला काहीतरी बोलायचे होते  (Read 3148 times)

Offline Nitin Pise

  • Newbie
  • *
  • Posts: 1
आज मला काहीतरी बोलायचे होते
बोलायला सोबतीला कोणी नव्हते

थोडा वेळ बसून विचार केला
येईल कोणीतरी सोबतीला
मनात काहितरी सलत होते
पण ओठावर काही उमजत नव्हते

पाहिले वळून चोहीकडे
पहात नव्हते कोणी माझ्याकडे
वाट पाहू कुणाची कशाला?
कशाला कुणाला बोलायचे?

क्षणात उठलो गेलो नदीवर
पोहत होती मुले तीरावर
ऐकायला नव्हते माझे कोणी
बोलायचे राहून गेले मनामधी

माझे कुणाला ऐकायचे नव्हते
मला काहीतरी बोलायचे होते

-नितिन पिसे
« Last Edit: November 27, 2014, 04:25:01 PM by Nitin Pise »