Author Topic: पहाट  (Read 1625 times)

Offline Csushant

  • Newbie
  • *
  • Posts: 9
पहाट
« on: November 29, 2014, 06:09:34 PM »
अलगद अलगद हलकेच नाजूक,
नवकुसुमांची घेऊन सोबत,
ओढली धरेने
सोनेरी  किरणांची झालर!

जरी होता त्रिमितीत काळोख,
स्पर्शता रविकिरणांनी पूर्व क्षितीज,
गुंजले पक्ष्यांचे कूजन
दुभंगलेल्या आसमंतात!

मावळत्या चांदण्यांना देता निरोप,
कुणाचे  बरे ओघळले अश्रुंचे चार थेंब,
विसावले  ते दवबिंदू होऊन,
हिरव्या गर्द गवती पात्यांवर!

जरी आहे ठाऊक,
मावळणार हा दिनकर,
रोजचाच आहे उगवत्या-मावळत्या सावल्यांचा खेळ ,
सृष्टीचा तर एकच नियम ,
नवचैतन्याला करणे सलाम !!!

Marathi Kavita : मराठी कविता

पहाट
« on: November 29, 2014, 06:09:34 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):