Author Topic: सागराची लाट  (Read 2040 times)

Offline Csushant

  • Newbie
  • *
  • Posts: 9
सागराची लाट
« on: November 29, 2014, 06:27:48 PM »
हे आयुष्य असते सागराची लाट,
भरतीत चिंब भिजवून जाई,
ओहोटीत शिंपल्या परी आठवणी ठेवून किनारी!

हे आयुष्य असते चंद्राची कोर,
पौर्णिमेस नभमंडळ उजळून जाई,
अमावस्येस चांदण्या ठेवून सोबती!

हे आयुष्य असते गुलाबाचे फूल,
विरक्त पाहता नयनसुख देई,
ओरबाडता फक्त काटे ठेवून जाई!

Marathi Kavita : मराठी कविता