Author Topic: ॥ ऋणं ॥  (Read 1793 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 171
॥ ऋणं ॥
« on: December 06, 2014, 10:13:54 AM »
        ॥ ऋणं ॥

उमलणार्या या कळ्यांनो
तुम्ही सुगंध द्यावा सर्वाँना
विसरु नका परि कधिही
त्या उमलविणार्या झाडाला ॥

झाडांनो तुम्ही उंच उंच जावे
आकाशाला कवेत घ्यावे
विसरु नका परि त्या मातीला
जिने तुजसाठी जीव अर्पिला ॥

मानसा तु खूप मोठे व्हावे
या विश्वासा मुठीत घ्यावे
स्मरणी असु दे तुझ्या निरंतर
मानवता अन् एक ईश्वर रे!  ॥

---राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता