Author Topic: खरा भाग्यवान  (Read 1459 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
खरा भाग्यवान
« on: December 31, 2014, 08:54:38 AM »
श्रेष्ठ धर्माचा वंशज म्हणुनी
बोले कुणी भाग्यवान !

श्रीमंताचा  वंशज  म्हणुनी
बोले कुणी धनवान !

साधु संतांचा वंशज म्हणुनी
बोले कुणी भगवान !

पुजाराचा वंशज म्हणुनी
बोले कुणी पुण्यवान !

कुण्या धर्माचा,कुठे जन्मला
नसे त्याला रे मान !

माणूस असुनी माणसासारखे
जाती सर्वाचे प्राण !

श्रेष्ठ नसती धर्म कुणाचा
काढा,वाईट विचाराची घाण !

दिन दुबळ्याची करुनी सेवा
जे करती तयाला दान !

तेच असती या भूवरी
सर्वात मोठे धनवान !

संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता