Author Topic: स्वर्ग भू तलीचा  (Read 1145 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,276
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
स्वर्ग भू तलीचा
« on: January 09, 2015, 11:42:56 AM »
स्वर्ग भू तलीचा

उंचावर थोडसं
घरट असावं
बघता दिसावी
हिरवळ धरणी

असतो जेथे
झुळझुळ वारा
शिळ वेळुची न्
खळखळ पाणी

पडातो सडा
इंद्रधनु फुलांचा
गुंजातात जीथं
पाखरांची गाणी

आंबा काजूला
फुलतो मोहोर
गंध नशिला
रहतो ध्यानी

स्वर्ग भू तलीचा
भासतो जणू
पाजून गोडवा
नारळ पाणी

लाल तांबूस
धूळ वाटेवर
चालू उमटवित
पाऊल निशानी

दूर दिसावं
निळसर चमचम
गाजत वाजत
सागर पाणी

©शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता