Author Topic: ... स्वामी विवेकानंद ...  (Read 2878 times)

Offline manish@26s

 • Newbie
 • *
 • Posts: 30
 • Gender: Male
 • being silent is my attitude
... स्वामी विवेकानंद ...
« on: January 11, 2015, 10:51:01 PM »
...स्वामी विवेकानंद...
                       ( युवकांचे प्रेरणास्थान )

नमस्कार मित्रांनो ,
माझ नाव - मनिष हरिश्चंद्र सासे
आज दिंनाक- 12 जानेवारी 2015 म्हणजेच आपले आदर्श युवकांचे प्रेरणास्थान "स्वामी विवेकानंद" यांची जयंती व् राष्ट्रिय युवक दिन
संपूर्ण विश्वाला व् युवकांना त्यांच्या सुंदर सुविचारानी दिलेली प्रेरणा तसेच आम्हा समोरील एक आदर्श व्यक्तीमत्व ते म्हणजे स्वामी विवेकानंद , आज त्यांची जयंती व् राष्ट्रिय युवक दिन म्हणून मी माझ्या स्वलिखित कवितेतून त्यांच्या बददल माझे विचार मांडत आहे...!


आज राष्ट्रिय युवादिन म्हणून
झालो आपण एकजुट संकलित
साष्टांग नमस्कार करुनी त्यांस
मांडतो कवितेतून स्वामींचे मनोगत


खरोखरच देव आहे का ?
या शोधात ते बाहेर पडले
श्री.रामकृष्ण परमहसाच्या
सहवासात त्यांचे जीवनच
बदलून गेले


जागतिक शिकागो परिषदेमध्ये
नव कौशल्य त्यांनी दाविल
माझे, प्रिय बंधु अन भागिनो म्हणून
सारया जगाला त्यांनी जिंकवल


एकाग्रता हिच त्यांची
चमत्कारिक शक्ती होती
सु-विचारांनी जग जगन
या विचारांची युक्ती होती


विवेकानंद या नावाचे
एक वैचारिक वादल होत
मानवता धर्म अन देशासाठी
प्रेरणा देऊन झटत होत


विवेकनंदाची विचार संपदा
आहे जरी अथांग
सारी तरुण पीढ़ी त्यांच्या
विचारात स्मरुनी दंग


त्यांनी जगण्याला अर्थ दिला
यूवकाना प्रेरनेचा ग्रंथ दिला
सुन्दर विचारांनी बोध देउनी
माझ्या भारताचा उज्वल तारा झाला


मानव कुलाच्या प्रवासी दिशेन
घडवली अपेक्षा , आकांक्षा
कर्मयोगी  आणि भक्तियोगी
युवकाना दिली प्रेरनेची आशा


आम्हा युवाकांपुढील
स्वामी हे प्रेरणास्थान
आम्हास जगायची प्रेरणा शिकवून
आमच्या मनात त्यांच अधिष्टान


कीर्ति होती महान म्हणुनी
त्यांस भुलविन्यास अमेरिकेने
पाठवली जग सुंदरी
आईची तिला उपमा देऊन
सीद्ध केलि ब्रम्हचारी


सोन चाफ्याच फूल ते
सुगंध कुशीत मावनार नाही
स्वामी नावाच्या देवाचा
विचारवंत आता भेटणार नाही

                    ... कवि ... ( मनिष सासे )
                                ( 8554907176  )

From ;- Kinhavali
Tal      ;- Shahapur
Dist    ;-  Thane


Marathi Kavita : मराठी कविता


Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Re: ... स्वामी विवेकानंद ...
« Reply #1 on: January 12, 2015, 12:21:17 AM »
MK वर आपले स्वागत आहे.
कविता उत्तम आहे. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची आजच्या पीढ़ीला खुप जास्त गरज आहे.

धन्यवाद्.