Author Topic: माँसाहेब  (Read 2823 times)

Offline virat shinde

  • Jr. Member
  • **
  • Posts: 82
माँसाहेब
« on: January 12, 2015, 12:24:40 AM »
माँसाहेब जिजाऊ जन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शिवेच्छा....
जन्मोत्सवाच्या निमित्ताने सादर....

माँसाहेब आम्हाला माफ करा
या महाराष्ट्राला लागलाय दुर्दैवी शाप खरा
ईथे फक्त वाहतोय वादळी वारा
आण प्रत्येक पावसा सोबत पडतात निर्दयी गारा

माँसहेब आपण गुलामगिरीला तडा दिला
आंधारलेल्या समाजाला स्वराज्याचा धडा दिला
आज त्याच मातित जातोय तडा
कुठेही शिवराय होत नाही खडा

माँसाहेब  माणुसकीला लागलीय आग
चहूकडे माजलीया फक्त भागमभाग
सगळेच स्वतःला म्हणतात वाघ
पण पाहीलंच खर तर हे सगळेच आहेत नाग

माँसाहेब आपण तर रणरागीनी होता
पण आज घर घर की कहानी पूरताच आहे गोता
सासू सुनांचा मेळ बसना काय सांगू आता
सगळी कडे घडतात रामयण अण महाभारताच्याच कथा

माँसाहेब आपण खुप ग्रेट आहात
या राष्ट्राला मिळालेली अनमोल भेट आहात
भल्या भल्यांसाठी आपण चेक मेट आहात
खरच स्वराज्यासाठी आपण दिव्य भेट आहात

माँसाहेब  आपल्या मात्रत्वाला तोड नाही
घडवले शिव-शंभू त्यांच्या सारखा जगात जोड नाही
आज पुन्हा एकदा सुसाट सुटलय वादळ
या वादळाला रोखनारा स्वराज्याचा तारा नाही

माँसाहेब महाराष्ट्राची खंत तरी सांगावी काय
बळीराजाच उपाशी त्याला भिक सुद्धा मिळत न्हाय
आत्महत्या शिवाय त्याला सुचनार तरी काय
रोज उपाशी राहत आसेल जर त्याचीच माय

माँसाहेब आपण समतेची शिकवण दिली
पण खंत एवढीच ईथे जातीयत्ता रूढ झाली
इथली शांती इथली कधीच भंग झाली
आत्ता ईथे कुणीच नाही कुनाचा वाली

माँसाहेब याच पुरोगामी महाराष्ट्राला घडवल आपण
पुर्ण केल आपल स्वराज्याच सपणं
पण पुरोगामी पणाचा कधीच लिलाव झाला
महाराष्ट्राच्या समतेला कधीच तडा गेला

माँसाहेब आता एवढीच आशा करतो
उरलेल्या माणुसकीला प्रतेक मस्तकात पेरतो
समतेची शिकवण घेऊन प्रतेकाला घेरतो
स्वराज्याची प्रेरणा प्रतेक मना मनात भरतो

माँसाहेब लढण्यासाठी बळ मागतो
मानसाला माणुस म्हणुन शिकऊन बघतो
जमेल तिथे आपल्या संस्काराचे मोल सांगतो
माणसं बदलण्यासाठी फक्त एवढच भिक मागतो....

    ✒ विराट शिंदे (9673797996)

Marathi Kavita : मराठी कविता