Author Topic: गीत ऐक्याचे ।  (Read 1070 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 229
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
गीत ऐक्याचे ।
« on: January 12, 2015, 08:04:27 PM »
गीत ऐक्याचे ।
या सुरांनो या मैफिलित माझ्या
या फुलांनो या ओंजळीत माझ्या
गाऊ गीत सामंजस्याचे अन् प्रेमाचे
पसरऊ सुगंध ऐक्याचे अन् मानवतेचे
या मुलांनो या शाळेत माझ्या
गाऊ गीत सत्यतेचे शाळेत माझ्या
मी मराठी मराठीच बाणा माझा
शिवराय आमुचे दैवत महाराष्ट्र माझा
या रे या दीन दलीतांनो झोपडीत माझ्या
मीठ भाकरी खाऊ झोपडीत माझ्या
गाणे जुनेच माझे गाऊ नव्या स्वरात
एक संघ होवू या नव्या युगात
श्री. प्रकाश साळवी
दि. 12/01/2015

Marathi Kavita : मराठी कविता