Author Topic: लाखात एक माझा भीमराय होता  (Read 1587 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
लंगड्याचा पाय होता
अनाथाची माय होता
वासराची गाय होता
लाखात एक असा
माझा भिमराय होता ! !

" बाबासाहेब फक्त तुमचे
असे बोलतात जातिवादी चमचे
अरे बाबा ना तुमचे ना आमचे
बाबा साऱ्या दीन दुबळ्याचे
म्हणून सांगतो "

तलवार दुधारी होता
सर्वांना भारी होता
दलितांचा कैवारी होता
मनुवादाला अघोरी होता
लाखात एक असा
माझा भीमराय होता ! !

" मनुवादाची नांगी ठेचली जाळून
म्हणूनच तर तो आमच्यातून गेला पळून
हिम्मत नाही होत त्याची पून्हा बगाया वळून
बाबा मुळेच पडला आता तो गळून
म्हणून सांगतो "

विचारी शूर होता
रामजीचा वीर होता
दलितांचा धीर होता
निर्मळ तो नीर होता
लाखात एक असा
माझा भीमराय होता ! !

" चातुर वर्णाचे कापीले नाक
होता बाबाचा साऱ्याला धाक
बघून त्याला घाबरे वाघ
कारण
होता तो साऱ्या बापाचा बाप
म्हणून सांगतो "

उत्तुंग नभी बाज होता
डरकारी वनी वाघ होता
दीन दुबळ्याचा आवाज होता
दलिताची तो लाज होता
लाखात एक असा
माझा भीमराय होता ! !

जय भीम

संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Crossredbu

  • Newbie
  • *
  • Posts: 2
Re: लाखात एक माझा भीमराय होता
« Reply #1 on: January 30, 2015, 10:43:44 AM »
Reading anything from a Phrase lot.