Author Topic: चंदनासम झिजून तुम्ही आम्हास सुगंध दिला  (Read 1662 times)

Offline Vikas Vilas Deo

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
चंदनासम झिजून
तुम्ही आम्हास सुगंध दिला

निरांजनाप्रमाणे जळत
तुम्ही आम्हास प्रकाश दिला

सूर्य सारखे धगधगत
 तुम्ही आम्हास उब दिली

वृक्ष सारखे कष्टुन
 तुम्ही आम्हास श्वास दिला

पर्वत सारखे अटल राहून
 तुम्ही आम्हास आधार दिला

नदीसम सतत वाहन राहून
 तुम्ही आम्हास जीवन दिले

मारूताप्रमाणे वाहन राहून
 तुम्ही आम्हास प्राण दिला

आकाशाप्रमाणे झेलून सारे वार
 तुम्ही आमच्या  डोक्यावरचे छत्र झालात

 धरती समान  सोसून सारे कष्ट
 तुम्ही आम्हाला आधार दिला

गुरू प्रमाणे देऊन
 तुम्ही आम्हास आकार  दिला

ऋण कसे फेडावे तुमचे
 तुम्हीच तर  आम्हास हा देह दिला


Marathi Kavita : मराठी कविता


patil's

  • Guest
Atishay sundar bhavanatmak tasech prernadai kavita..