Author Topic: नाती  (Read 1664 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,258
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
नाती
« on: February 15, 2015, 09:11:55 AM »
नाती

कधी अचानक
जुळतात ना ती
अहंकार दाेषाने
तुटतात ना ती !

फुलपाखरा गत
असतात ना ती
ओंजळ थेंबापरि
जपावीत ना ती !

घट्विण रेशीम
असतात ना ती
गाठ सैलावती
सावरतात ना ती !

देणे ईश्वराचे
असतात ना ती
जीवापाड प्रेमाने
जपावीत ना ती !


©शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता