Author Topic: तुला विश्वास हवा फक्त तुझ्यावर...  (Read 2209 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
तुला विश्वास हवा
तुझ्या श्वासवर
तुला विश्वास हवा
तुझ्या नात्यावर
आता ह्या क्षणी
आता ह्या वेळी
कोण काय बोलते
ते नाही महत्वाचे
आपण काय करतो
आपण कसे वागतो
ते असावे नेहमी सत्वाचे
तुला विश्वास हवा
तुझ्या सत्वावर
तुला विश्वास हवा
तुझ्या तत्वावर
बोलणारे बोलतात
करणारे करतात
कारण नसताना
हसणारे हसतात
तुला विश्वास हवा
तुझ्या करण्यावर
तुला विश्वास हवा
तुझ्या असण्यावर
जग बदलतेय
माणसे बदलतील
कधी जवळचे
सूरा खुपसतील
त्यांच्यासारखे नाही आपण
आपण गाय मारणार नाहीत
त्यांनी गाय मारली म्हणून
आपण वासरु मारणार नाहीत
तुला विश्वास हवा
तुझ्या श्वासवर
तुला विश्वास हवा
तुझ्या नात्यावर
तुला विश्वास हवा
फक्त तुझ्यावर
तुला विश्वास हवा
फक्त तूझ्यावर.....
... अंकुश नवघरे.
(स्वलिखित)©
19.02.2015
11.00 pm