जगतवंद्य माऊली
राजमाता जिजाई
आपल्या चरणी पडे अपूरी
सप्त स्वर्गाची नवलाई ॥
यवनांचा थैमान सर्वत्र
तुम्हास साहवेना
लूटल्या जाती आयाबहिणी
तुम्हाला पाहवेना
येवूनी पूण्यात ओसाड रानात
फूलवली तूम्हीच हिरवाई ॥
क्षत्रिय कूलावंत शिवबा
तूम्हामूळेच हो घडे
तव प्रेरणे शिकले
हिंदवी स्वराज्याचे धडे
नित्य स्मरणात मावळ मनात
आपली थोर पूण्याई ॥
तुम्ही ठसवली राजांप्रती
राजकारण रयतसेवा
नाही मानली जात पात
नित्य जपले बंधूभावा
तुम्हापरी जगती पुन्हा
नाही होणे थोर आई ॥
== किरण गोगावले
9923543991