Author Topic: मराठी माउली  (Read 971 times)

मराठी माउली
« on: February 27, 2015, 06:13:35 AM »
मराठी असे माझी माउली
मराठी होते माझी सावली
बोली अनेक असती जरीही
मुखी मराठी पावलोपावली

गाथा मराठी ज्ञानेश्वरी मराठी
इतिहासाच्या बखरी मराठी
अटकेच्याही पार मराठी
शिवबाची तलवार मराठी

मराठी बाणा मराठी कणा
मराठी आधार मराठी जना
महाराष्ट्राच्या घरोघरी
मराठीचीच उपासना

ओठी मराठी पोटी मराठी
सकळांची रोजीरोटी मराठी
आस मराठी घास मराठी
महाराष्ट्राचा श्वास   मराठी

मराठी असे आमचा प्राण
मराठी आमचा स्वाभिमान
अमृताशी पैज जिंके
असा मराठीचा असे मान
Typed with Panini Keypad
« Last Edit: February 27, 2015, 06:22:25 AM by awale dhananjay »

Marathi Kavita : मराठी कविता