Author Topic: बाबा , तुझ पोरं शिकतय  (Read 1307 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
बाबा , तुझ पोरं शिकतय
« on: February 27, 2015, 08:04:19 PM »
या रंगीन दुनियेत जरी तुला मुकतय
तुझ्या विचारधारेवर चालाया जरी ते चुकतय
33 कोटी देवते समोर जरी ते झुकतय
तरीही बाबा....!  तुझ पोरं शिकतय !!

आज पोचला तो प्रत्येक क्षेत्रात
बसतो तो सर्व आधुनिक पात्रात
शूद्र म्हणुनी ना त्याला कुणी हिणवत
ठामपणे मांडतो जगाशी आपले मत
बुद्धाच्या शीलाला जरी ते हुकतय
तरीही बाबा.....! तुझ पोरं शिकतय !!

तुझ्याच आरक्षणाचा त्याला फायदा मिळाला
तरीही तुझा विचार त्याला नाही कळाला
शिकून सवरुनही तो देवाकडेच पळाला
लागला पुन्हां तो अंधश्रद्धेच्या गळाला
चोरून चोरून समाजाच्या ते नवस फेडतय
तरीही बाबा.....! तुझ पोरं शिकतय !!

गावकुसाबाहेरच झोपड आता बंगला झाला
बघून त्याच सामर्थ्य दुश्मनही मित्र झाला
शिक्षणाने अन् जिद्दीने आज तो येसस्वी झाला
तुझ्या स्वप्नाचा आज त्याने साक्षातकार केला
पण मधे मधेच अंगी त्याच्या देव सवार होतय
तरीही बाबा . . . . . ! तुझ पोरं शिकतय ! !संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता