Author Topic: खूप काही मनात आहे  (Read 1843 times)

Offline kshitij samarpan

  • Newbie
  • *
  • Posts: 9
खूप काही मनात आहे
« on: March 05, 2015, 08:03:41 AM »
खूप काही …….

खूप काही मनात आहे
तरी पण कसे  सांगु ?

मनातील विचारांना बंधूनी  बसलोय मी,
तरीही त्याच्या उफ़ाळ्याना  आवर तरी कसा घालू!

रोज एक क्षण असा ,
जगण्याची दिलेली नवीन संधी जसा !

आकाशा एवढे विचारांनी , भारावलेल्या
या माझ्या मनातील लाटांना कसे सांभाळू !


ठीक नसुनही  ,सर्व ठीक होईल
असे बोलून , हृदयी हात तरी कसा ठेवू !

शून्यात पाहात आहे मि ,नव्या जिद्दीने उठलोय,
मग मी परिस्थितीच्या ,नावाखाली का गुडघ्यांवर रांगत जावू !

थोडासा फ्रेश  व्हावे म्हणुनी,फेसबुक वर आलोय मी,
हा पण विचारतोय मला,व्हाट  इज इन युवर माईंड !

आता काय बोलावे तेही  कळेना ,येथेही तेच आहे
खूप काही मनात आहे ,तरीही  कसे  सांगु !


क्षितीज समर्पण

Marathi Kavita : मराठी कविता

खूप काही मनात आहे
« on: March 05, 2015, 08:03:41 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):