Author Topic: समर्पण  (Read 1195 times)

Offline kshitij samarpan

  • Newbie
  • *
  • Posts: 9
समर्पण
« on: March 07, 2015, 09:58:15 AM »
समर्पण

एकांतात तुला आठवूणी पाहताना
तेंव्हा  हवी  होतीस तू माझ्या सोबतीला

तुझ्यासाठी साठविलेल्या  आठवणी तू  अनुभवताना
 उलघडा झाला असता तुला  माझ्या  प्रेमाचा


आजही आठवतो  तो रस्ता ज्याची
वळती  वाट तुझ्या घराकडे  चालताना

 तुला पाहण्यासाठी मारलेल्या त्या फेऱ्या
जरी ठाऊक होते तूच आहेस हृदयात माझ्या

तुझ्या सोबत चालण्यासाठी  घडविले आहे
मी तुझी नि माझी वाट एकच करताना

  फक्त एका  नजरेची  आस  होती माझ्या हृदयाला
तुझ्या नावाची  स्पंदने   तुला ऐकवताना

का ग  सांगावे लागले तुझा जन्म
आहे सार्थकी करण्यासाठी माझ्या जन्माला

तुला कधीच  का सांगत नाही तुझे हृदय
मी तुझाच आहे तु  तुलाच कुंकु लावताना

विलंब नको  करूस तू ईतका
विश्वासाचे नाते आपले पडताळताना


अखेरच्या क्षणी ही उघडे राहीलेले डोळे माझे
तुझ्याच वाटेकडे असतील तुलाच पाहताना

क्षितीज समर्पण

Marathi Kavita : मराठी कविता