Author Topic: तु..  (Read 1204 times)

Offline p.sarode@ymail.com

  • Newbie
  • *
  • Posts: 1
तु..
« on: March 10, 2015, 07:48:22 AM »
पाण्यासारखी तरल मनाची तू..
बर्फासारख्या पिघलणारया ह्यदयाची तू..

लाजाळूच्या पानासारखी लाजणारी तू..
कमळाच्या फुलांसारखी हसणारी तू..

मोगरयाच्या कळीसारखी उमलणारी तू..
सागरातील लाटांसारखी उसळणारी तू..

साधीराहणी उच्च विचारांची धनी तू..
पुस्तकी ज्ञानापेक्षा कल्पनारम्य जगात रमणारी तू..

तूझ्यामध्ये दिसते दर्शन माणूसकीचे ..
तूझ्यामध्ये होते दर्शन आधुनिक सभ्यतेचे..

तूझ्यामध्ये वसते मदतीचा हात ..
तूझ्या दृष्टीक्षेपातून पहायला मिळते भविष्याची सुप्रभात. .

तूझ्यात आहे सच्च्या मैत्रीचा ध्यास..
तूझ्यात आहे पवित्र गुरू-शिष्याचा विश्वास. .

तुझे पाझरणारे ह्रदय आहे. .
तुझा सर्वात मोठा ठेवा
करशील तू गरजूंचे भले
हाच विश्वास सदा सर्वदा ..

सगळीच सुखे आहे तूझ्या चरणी
तरीही नाही तूला त्याचा जराही घमंड..
जपशील तू हा मैल्यवान दागिना
जीवनात दरदिवशी अखंड. ..

घेशील उचंच उंच झेप
तू या निळ्याशार गगनात ..
माझी तूला सदा सोबती राहील
प्रत्येक तूझ्या चांगल्या कामात. ..
  :)

Marathi Kavita : मराठी कविता