Author Topic: कसे आसवे हे असे असावे  (Read 1229 times)

Offline hareshparab

  • Newbie
  • *
  • Posts: 5
कसे आसवे हे असे असावे
« on: March 14, 2015, 02:09:18 PM »
कसे आसवे हे असे असावे
सुंदर हे जग आपले असे असावे
हिरवळीने भरलेले अन् स्वच्छ
अगदी स्वर्गा सारखे नितळ शुभ्र असावे

निर्सग आपला हिरवी झाडे हि आपली
हा आसपासचा परिसरहि आपला
आपले घर जसे ठेवतो जपून
तसेच आपले शेजार जपावे 

कसे आसवे हे असे असावे
सुंदर हे जग आपले असे असावे

सुरुवात करावी आपल्या घरापासून
सुका कचरा अन् ओला कचरा नेहमी ठेवावा वेगळा
लावावी सवय आपल्या छोट्यांना स्वच्छतेची
आपणही स्वतः स्वच्छ राहावे

कसे आसवे हे असे असावे
सुंदर हे जग आपले असे असावे

लहान लहान सवयी असतात आपल्या
काहीही खावून कचरा टाकू नये इस्तः
प्लास्टिक वापरावे अगदी गरजेपुरते
सूत्र हेच सारे आपल्या आप्तेष्टांना सांगावे

कसे असवे हे असे असावे
सुंदर हे जग आपले असे असावे

गाडगे बाबा आपले सांगून गेले हेच सारे
जपावा त्यांचा वारसा स्वच्छतेचा
जगून बघावे कधी त्यांच्या परी
आयुष्य हे आपले असेच घडवावे
   
कसे असवे हे असे असावे
सुंदर हे जग आपले असे असावे

Marathi Kavita : मराठी कविता