Author Topic: माझ्या वाटा  (Read 1418 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,257
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
माझ्या वाटा
« on: April 07, 2015, 08:24:35 PM »
माझ्या वाटा

जगणे नियमात जरी जगाच्या
ध्येय्य माझे मीच ठरवितो,
कितीही असोत मार्ग खडतर
माझ्याच वाटा मी चालतो !

दंगतो आनंदे काव्या रंगी
साहित्यात मी नित्य रमतो,
जगण्या उरल्या दाहीदिशांत
माझ्याच वाटा मी चालतो !

जीवन असे हे नवरसयुक्त
प्राशन करूनी तरी तहाणतो,
अनवट स्त्रोत शोधित नवे
माझ्याच वाटा मी चालतो !

© शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता