Author Topic: छत्रपती  (Read 1061 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
छत्रपती
« on: April 28, 2015, 05:51:31 PM »
- - मी पाहिलेला छत्रपती शिवाजी - -


होता राजा माझा, साऱ्या जातीचा उध्दारकर्ता
नका ठेऊ रे त्याला, एकाच जाती पुरता ! !

राजा होता माझा, एक समतावादी
कट्टरवादी म्हणुनी, नका करू जातिवादी ! !

होत्या त्याच्या आपल्या, अठरा पगड जाती
बलिदान दिले साऱ्यानी स्वराज्यासाठी ! !

परस्त्री माँ समान, होती स्वराज्यात सक्ती
ठसठसुन भरली होती, माझ्या राजात मातृभक्ती ! !

अस्पृश्य समाज नव्हता त्याला दुजा
आठवा भवानी मंदिर
त्याने करविली होती महाराच्या हातून पूजा ! !

मनुवादी द्वेष तेंव्हा उखाडीला होता त्यांनी
मुर्दाड मने केले जिवंत, घालूनी नवी संजीवनी ! !

कुणी उच्चवर्णी ना कुणी तेथे सावळा
साऱ्या समाजास बनविले त्याने एक मावळा ! !

स्वराज्यासाठी निधड्या छातीने लढणारा महार
बनविला स्वराज्यात किल्ल्याचा किल्लेदार ! !


संजय बनसोडे
9819444028


Marathi Kavita : मराठी कविता