Author Topic: बा तुला काय सांगू...  (Read 878 times)

Offline virat shinde

  • Jr. Member
  • **
  • Posts: 82
बा तुला काय सांगू...
« on: May 10, 2015, 09:45:59 AM »
समाजातील काही सत्य आंगाला दर्शवनारी हि कविता
कुणाच्या विरोधासाठी नाही. पण झोपलेल्या प्रत्येक बापासाठी नक्कीच आहे.
विराट शिंदे 9673797996

बा तुला काय सांगू
माझ्या देशाची अवस्था तंग
गरिबाचे होतात बेहाल 
बामण दक्षणेने झालाय पंग
कलम कसायाच्या औलादी
झालाय दहशतवादी संघ

बा तुला काय सांगू
आमच्या इतिहासाची चाल
लेखनीचे शस्त्र वापरून
बहुजनांना केलय बेहाल
ईथे पंथ तुपाशी आहे
तरबहुजन उपाशी आहे

बा तुला काय सांगू
ईथल्या द्रोणाचार्यांची चाल
उजव्या हाताचा अंगठा तोडुन
करतोय एकलव्याचे बेहाल
कपटाचा कळस रचलाय
मनूच्या क्रुर लेखनीन

बा तुला काय सांगू
संत महात्म्यांच्या कथा
क्षमा, शांती, दया शिकवली
बडव्यांची हरामी झुकवली
समतेचा संदेश देत
त्यांनी आपुलकी टिकवली

बा तुला काय सांगू
पंजा नंतर छक्के आले
उद्योगपतीच्या घरामध्ये
यांचे इमान विकल्या गेले
चौमुलखाच्या छत्रपतीचा
आपमान ज्याने केला
त्या निच मानसाला
यांनी गुरू म्हणून स्वीकारला

बा तुला काय सांगू
या तिन टक्क्यांचा खेळ
त्यांच्या सोबत कितीही जोडला मेळ
तरी निच औलादी करतातच घोळ


     ✒विराट शिंदे
   

Marathi Kavita : मराठी कविता