Author Topic: तु माय भु माझी..  (Read 584 times)

Offline virat shinde

  • Jr. Member
  • **
  • Posts: 82
तु माय भु माझी..
« on: May 14, 2015, 10:42:22 AM »
आवडल्यास नक्कीच शेअर करा व आपल्या अमुल्य आशा प्रतीक्रीया कळवा...
विराट शिंदे - 9673797996

तु माय भू माझी...

माय भू तुझे थोर उपकार
दिलासी महापुर विचारांचा
तुकारामांनी सांगितले थोरपणा
जगण्यासाठी ठेवा ताठ कणा

नामदेवांनी मंत्र दिधला थोर
'ज्ञानदीप लावू जगी' गर्जला शोर
झोपलेल्या समाजाचा संपवला घोर
 धन्य धन्य नामदेव गर्जे लहान थोर

माय भू तु आम्हा प्रेरीका गं
दिधलासी छत्रपती शिवबां सारखा गं
पिडीतांचे कष्ट केले सारे नष्ट
आन्यायाला न्यायानेच केले त्यांनी संतुष्ट

माय भू तुझे आनंत उपकार
भयमुक्त केलास तू सारा संसार
करून मनुस्मृतीचा दाह संहार
बाबासाहेबांनी केले भटांनाही महार

माय भू तु ग न्याय गंगा आहे
महामानवांना जन्म देऊन
समतेचा न्याय सर्वांना देऊ पाहे
तृप्त होई जनसागर तुझ्या आसर्याने

  ✒ विराट शिंदे  9673797996

Marathi Kavita : मराठी कविता