Author Topic: गुरुजी जगण्याची लढाई शिकवा ?  (Read 1173 times)

Offline virat shinde

  • Jr. Member
  • **
  • Posts: 82
गुरूजी जगण्याची लढाई शिकवा ????

गुरूजी तुम्ही खुप काही शिकवल
शिकवता शिकवता आमच डोक पिकवल
पण आता हे काळ शिवार एकदा पिकवा
गुरूजी जगण्याची लढाई शिकवा ?

आता तर आठवी पर्यंत पासच होणार
'ढ' नावाचा प्रकार विस्मृतीत जाणार
जहाज कोणत्यातरी काठाला नेऊन टेकवा
गुरूजी जगण्याची लढाई शिकवा ?

गुणवत्तेचा प्रश्न आत्ता उरलाच नाही
स्पध्येत कोणी हरलाच नाही
आसला का आलाय प्रशासनाला लकवा
गुरूजी जगण्याची लढाई शिकवा ?

बेरोजगार आणि शिकलेले आज्ञानी
यांची संख्या खुप झाली आहे
त्या सर्वांचे अस्तीत्व टिकवा
गुरूजी जगण्याची लढाई शिकवा ?

जातीयवाद आण दंगली खुप झाल्या
आता सर्वांना समान लेखुन
समतेन भरलेल रान पिकवा
गुरूजी जगण्याची लढाई शिकवा ?

  ✒ विराट शिंदे  9673797996