Author Topic: धर्म  (Read 967 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
धर्म
« on: May 14, 2015, 03:39:07 PM »
धर्मासाठी माणूस नव्हे
माणसासाठी धर्म आहे !

सर्व धर्म समभाव
हेच साऱ्याचे कर्म आहे !

जातिवाद, धर्मवाद
हाच येथे अधर्म आहे !

माणसातील माणूसपण
हाच त्यातील मर्म आहे !

धर्म असो कोणताही
रक्त तर लाल आहे !

सनातनी भिक्षुशाहीची
ही सारी मायाजाल आहे !

जातिवाद पेटवण्याची
ही त्यांची ढाल आहे !

धर्म श्रध्दाळू जेल मधे
अन् हे सारे मालामाल आहेत !

प्राणीमात्रावर दया करणारा
तोच श्रेष्ठ मानव आहे !

 प्राण्यांची हिंसा करणारा
तोच येथील दानव आहे !


संजय बनसोडे
9819444028


Marathi Kavita : मराठी कविता

धर्म
« on: May 14, 2015, 03:39:07 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):