Author Topic: एवढचं शिक...  (Read 1801 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
एवढचं शिक...
« on: May 23, 2015, 01:27:12 PM »
दु:ख पाहुन तु थांबु नकोस,
कणखर पावलांनी चालायला शिक.
आठवू नकोस कमीपणा तुझा ,
धीर करुन ध्येयामागे पळायला शिक.
स्वप्नांमध्ये जास्त रमु नकोस,
स्वप्नांसाठी हक्काने जगायला शिक.
पुस्तकी घमंडात पडू नकोस,
निसर्गा कडुन मोठेपणा शिक,
जिंकण्याचा नेहमीच हट्ट धरु नकोस,
प्रामाणिक कष्टाने हारायला ही शिक.
शिक बाबा आणखी लई शिक,
पैसा नाव कमवायला नको,
माणसं जोडायला शिक.
शिकशील नेहमीच हे आनंदाचे गाणे,
संकटात स्वत:ला धीर द्यायला शिक,
द्वेष न मस्तर काढेल माणुसकीचा काटा,
त्यासाठी निस्वार्थी प्रेम करायला शिक,
काही झाल तरी सन्माने जगायला शिक,
विसरुन सारे जुन वैर,
परत सोबत राहायला शिक
...

Marathi Kavita : मराठी कविता


vikas madavi

  • Guest
Re: एवढचं शिक...
« Reply #1 on: May 26, 2015, 03:39:53 PM »
very motivational poem
to do gre8ter in life and learning from this world