Author Topic: प्रेम आणी करुणा जपायला शि  (Read 1099 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
दु:खाचा डोंगर पाहुन थांबु नकोस,
सावरुन नव्याने पार करायला शिक.
आठवु नकोस भुतकाळातल काही,
ध्येयपूर्तीसाठी पळायला शिक.
स्वप्नामधल्या जगण्यात गुंतू नकोस,
स्वप्नासाठी हट्टाने जगायला शिक.
द्न्यानामुळे मोठेपणाच्या घमंडात राहू नकोस,
विसरुन अक्षरांशी नातं थोड माणसासारख वागायला शीक.
जिंकशीलच नेहमी असा हट्ट धरु नकोस,
प्रामाणिकपणाने अपयश पचवायला शिक.
शिक तू संकटातून स्वत:ला सावरायला शिक.
द्वेष , मत्सर माणुसकीचा काडेल रे काटा ,
त्यासाठी प्रेम आणी करुणा जपायला शिक.