Author Topic: माझी कवीता  (Read 999 times)

Offline sanjay bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 251
माझी कवीता
« on: June 02, 2015, 04:09:45 PM »
माझी कवीता नसते फक्त लाईक घेण्यासाठी
तर माझी कवीता असते समाज परिवर्तनासाठी !

माझी कवीता नसते मुलींच्या प्रेमासाठी
तर माझी कवीता असते महापुरुषाच्या प्रेमासाठी !

माझी कवीता नसते गुलगुल हसण्यासाठी
तर माझी कवीता असते अंधश्रद्धा मिटवण्यासाठी !

माझी कवीता नसते फिल्मी  हीरो हिरोईनसाठी
तर माझी कवीता असते माझ्या गरीब शेतकऱ्यांसाठी !

माझी कवीता नसते राजकारण्याची स्तुती करण्यासाठी
तर माझी कवीता असते माजलेल्याला वठणीवर आणण्यासाठी !

माझी कवीता नसते बावळट जाती धर्मासाठी
तर माझी कवीता असते मानवता शिकवण्यासाठी !

माझी कवीता नसते कुण्या आंधळ्या भक्तासाठी
तर माझी कवीता असते परिवर्तित व्यक्तीसाठी !

माझी कवीता नसते माजलेल्या वळूसाठी
तर माझी कवीता असते रंजल्या गांजल्यासाठी !


संजय बनसोडे
9819444028

Marathi Kavita : मराठी कविता

माझी कवीता
« on: June 02, 2015, 04:09:45 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):