Author Topic: आज रायगड पुन्हां जिवंत झाला  (Read 1408 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
शिवरायाच्या जयघोषाने सह्यांद्रीला जाग आला
छत्रपतीचा जयघोष करीत मर्द मराठा छावा आला
राजे . . . . आज रायगड पुन्हां जिवंत झाला !!

खुष झाला बघून पुन्हां, तुमचा हरेक मावळा
आला रायगडा बघण्या, तुमचा राज्यभिषेक सोहळा
 रायगड भूमीवरती पुन्हां, सिंहरूपी आवाज झाला
राजे . . . . . आज रायगड पुन्हां जिवंत झाला !!

तुम्हामुळेच राजे आम्हीं,आज मर्द मराठा झालो
दुश्मन थरथर कापे बघुनी, आज सिंहाचा छावा झालो
आज इन्द्रही चरणी तुमच्या, बघा नतमस्तक झाला
राजे . . . .  . आज रायगड पुन्हां जिवंत झाला !!

काळजात कोरुन ठेविली, आम्हीं शंभू शौर्य गाथा
शिवकार्याचा टीळा लावीला आम्हीं आमुच्या माथा
जय जिजाऊ जय शिवाजी, जयजयकार केला
राजे . . . . .  आज रायगड पुन्हां जिवंत झाला !!


संजय बनसोडे
9819444028