Author Topic: प्रेम काय असते खरच अजून समजले नाही मला  (Read 1167 times)

Offline ravindra909

  • Newbie
  • *
  • Posts: 15

दिवसाला रात्र म्हणायची मला सवय नाही ग
खोट्याला खर करायचे मला जमत नाही ग
मी बुद्धाचा भीमाचा अनुयायी सांगतो स्पष्ट तुला
प्रेम काय असते खरच अजून समजले नाही मला ।। धृ ।।
पाहतो सिनेमा तेव्हा प्रेम करणारे नट नटी दिसते
पण ते हि एक सोंग असल्यासारखे वाटते
असे सांगता मला कि प्रेमाला उपमा नसते
आता उपम्याला प्रेमाची काय गरज भासते
तुझ्या प्रेमाचा स्वीकार करण्याचे जमेल का मला
प्रेम काय असते खरच अजून समजले नाही मला ।। १ ।।
तू हिंदू म्हणून जगतेस तुझ्या घरात
मी बौद्ध आहे हे बसेल का तुझ्या मनात
बापाला नाही पटणार तुझ्या काढेल तुझी वरात
उगाच दुःख नाही द्यायचे मला तुझ्या मनात
असाच बरा आहे मी एकटेच राहू दे माझ्या मनाला
प्रेम काय असते खरच अजून समजले नाही मला ।। २ ।।
तुला करावे वाटेल लग्न माझ्याशी पण परंपरा आडवी येईल
आयुष्याच्या वाटेवर दूर तुला नेईल
विचार कर जरा बौद्ध झाल्यास काय तुझे होईल
देव तुझा पाण्यामध्ये वाहून जाइल
माझ्यासारखे जीवन जगणे जमेल का तुला
प्रेम काय असते खरच अजून समजले नाही मला ।। ३ ।।
विचारांचे नात माझ्या घरामध्ये असते
देवांना कर्मकांडाना इथे काही महत्व नसते
श्रद्धा सुद्धा माझ्या इथे दूर गेलेली दिसते
अन्याय झाल्यास ज्वालामुखी जिवंत होते
असे जीवन जगणे जमेल का तुला
प्रेम काय असते खरच अजून समजले नाही मला ।। ४ ।।
बाबासाहेब यांची शिकवण लागण पानापासून आहे माझ्यावर
स्त्री सत्ताक पद्धती आहे आमच्या घरावर
स्वतंत्र जीवन जगण्याचे संस्कार आहेत आमच्यावर
तुला हि समजेल तू लग्न केल्यावर
आवडेल तुझ्याशी मला हि लग्न करायला
प्रेम काय असते खरच अजून समजले नाही मला ।। ५ ।।
सोडाव्या लागतील तुला तुझ्या सगळ्या परंपरा
कारण माझ्या घरात वाहतो मानवतेचा वारा
देवधर्माला गाडले देवून क्रांतीचा नारा
बुद्ध धम्म जाणून घ्यावा लागेल सारा
मी बुद्धा चरणी नमवला माथा ते जमेल का तुला
प्रेम काय असते खरच अजून समजले नाही मला ।। ६ ।।
शेवटी सांगतो तू आवडतेस मला जात नाही बघायची ग
प्रेमाच्या दुनियेत आंधळे होवून नाही जगायचे ग
नाही तोडू शकणार चंद्र तारे तुझ्यासाठी ग
वास्तवात जगतो आम्ही साधे फुल सुद्धा देवू शकत नाही ग
कारण नाही अधिकार ते फुल तोडण्याचा मला
प्रेम काय असते खरच अजून समजले नाही मला ।। ७ ।।