Author Topic: ३३ कोटीला भारी जिजाऊ चा तो लेक  (Read 926 times)

Offline ravindra909

  • Newbie
  • *
  • Posts: 15

शिवजयंतीचा सन  लाखात  एक
३३ कोटीला भारी जिजाऊ चा तो लेक ।। धृ ।।
आदिलशाही मोडली निजामशाही तुडवली
मोघलशाही झुकवली ब्राह्मणशाही गाडली
दिला समतेचा नारा असा  हा नेक
३३ कोटीला भारी जिजाऊ चा तो लेक  ।। १ ।।
स्वातंत्र्य समता बंधुता न्यायाची रे मांडणी
स्वराज्याचे देवून दान हि युगायुगाची आखणी
जातीवाद्याना दिला समानतेचा धाक
३३ कोटीला भारी जिजाऊ चा तो लेक  ।। २ ।।
जिजामातेची शिकवण ऐशी धरावी समतेची कास
स्वराज्य  हे रयतेचे रे हाच जणांचा ध्यास
अरे  न्यायाची दिली रे सर्वाना हाक
३३ कोटीला भारी जिजाऊ चा तो लेक  ।। ३ ।।
जुलमी अत्याचारी ती रे मुघलशाही
धर्मांधतेचा कहर करती ती रे ब्राह्मणशाही
शिवशाहीचा इशारा  दिला हा एक
३३ कोटीला भारी जिजाऊ चा तो लेक  ।। ४ ।।
युगसूर्य हा उगवला निळ्या निळ्या ह्या नभात
रवि  किरण हे पोहचू लागले बहुजनाच्या मनात
हा युगाचा युगप्रवर्तक नेक
३३ कोटीला भारी जिजाऊ चा तो लेक ।। ५ ।।
गीत रचना : रविंद्र सावंत
चाल : एकविरेची पहात होते वाट