Author Topic: काय करणार राजे तुम्ही आम्हाला समजलाताच नाही  (Read 1009 times)

Offline ravindra909

  • Newbie
  • *
  • Posts: 15

हे शिवराया तुझ्या राज्यात तू स्वातंत्र्या सोबत समानता आणलीस
मानवतेच्या महामानवा तू  लोकामध्ये नवचेतना निर्माण केलीस
रे उभ्या जगाला हेवा वाटावं ऐसे  कर्तुत्व तुझे पण इथल्या लोकाना कधी कळलेच नाही
काय करणार राजे तुम्ही आम्हाला समजलाताच नाही ।। धृ ।।
जातीपातीच्या भिंती राजे तुम्ही बालपणीच पाडून टाकली
समानतेचा संदेश देत नवी प्रभा हि फाकली
जन्म तुझा ऐसा झाला नवचैतन्य जागृती झाली
उभा महाराष्ट्र धरणी आनंदाच्या रंगात नाहून गेली
पण राजे इथल्या काही लोकांच्या चेहऱ्यावर आनंद कधी दिसलाच नाही
काय करणार राजे तुम्ही आम्हाला समजलाताच नाही ।।१ ।।
आदिलशाही कुतुबशाही निजामशाही तुडवली तुम्ही पायी
मोघलाना सुद्धा रवडले राजे तुम्ही त्याच्या ठाई
तुमच्या कार्याची या लोकाना जाणीव दिसेना काही
तुम्हालाच जातीत विभागून ठेवले अशी यांची किमया सारी
अहो राजे घालतात जयंतीचा वाद उद्या म्हणतील शिवाजी राजे जन्मलाच नाही
काय करणार राजे तुम्ही आम्हाला समजलाताच नाही  ।। २ ।।
राजे देवाबुवाच्या नादी कधी लागलाच नाहीत आपण
तुमच्या रयतेची घेणारा देव हि नाही एकपण
तरीदेखील भवानीला तुमच्या माथी मारतात
रामदासला नाहक तुमचा गुरु बनवतात
राजे रयत तुमची आता तुमची राहिलेली नाही
काय करणार राजे तुम्ही आम्हाला समजलाताच नाही ।। ३ ।।
आता तर राजे राजकारणात तुम्हाला भारी आहे मान
तुमच्या पेक्षा  नेता मोठा तुम्हाला केलाय त्यांनी लहान
आजला राजे तुमच्या स्वराज्याची भीड कोणास वाटेनाशी झाली
रांझ्याच्या पाटलांची आता  सत्ता आहे आली
राजे तुमच्या लेकीबालींची तमा कोणाला राहिलीच नाही
काय करणार राजे तुम्ही आम्हाला समजलाताच नाही ।। ४ ।।
राजे तुमच्या लेकी पण लय भारी कधी तुमच्यापुढे वाकल्याच नाहीत
तुमचा इतिहास तर राजे साधा उघडून सुद्धा पाहत नाहीत
तुमच्या बांधलेल्या गडावर यांच्या इष्कबाजीचे नमुने मिळतात
तुमच्याच राज्यात आज महिला विकल्या जातात
राजे तुम्ही स्त्रीला सत्तेवर बसवले आताच्या स्त्रीला कळले नाही
काय करणार राजे तुम्ही आम्हाला समजलाताच नाही ।। ५ ।।
राजे तुमच्या हुशार किल्लेदाराने स्वराज्य घटनेत आणले
पण राजे तुमच्या पंतप्रधानाने स्वराज्य नेस्तनाभूत केले
राजे तुमच्या स्वराज्याचा आज हि गौरव केला जातो तो बाहेरच्या देशात
आमचे दळभद्री लोक कसे काय राहतात या भारत देशात
राजे काल्पनिक देवांच्या साठी सरकारी रजा आहे तुमच्यासाठी नाही
काय करणार राजे तुम्ही आम्हाला समजलाताच नाही ।। ६ ।।
राजे तुमचा हा रवि सदोदित तुमच्या चरणाशी राहतो
येणाऱ्या जाणाऱ्याला तुमचा इतिहास सांगतो
राजे तुम्ही परिवर्तन केल होत दुसऱ्या राज्याभिषेकानी
राजे त्याच धम्माचे  अनुसरण करतो आहे आपल्या आशीर्वादानी
बाबासाहेबांनि तुमची सारी ध्येये पूर्णत्वास नेली
काय करणार राजे तुम्ही आम्हाला समजलाताच नाही ।।७।।
राजे तुमचा पुत्र मोघलांच्या तावडीत देणाऱ्या काहींच्या औलादी आहेत
तुमच्यावर पहिला वार करणाऱ्या भास्कराच्या हि पिलवली आहेत
राजे तुमच्या राज्याभिषेकावर आक्षेप घेणाऱ्या नादानांची  वारस आहेत
राजे तुमचे स्वराज्य बुडवणाऱ्या पेशव्यांसारखी नालायक लोक आहेत
तरी हि राजे तुमचा हा मावळा तुमचा इतिहास पुसू देणार नाही
काय करणार राजे तुम्ही आम्हाला समजलाताच नाही ।। ८ ।।

रविंद्र  सावंत  ९१६७३४६८८३

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):