Author Topic: नसीबवाल्यांच प्रेम  (Read 984 times)

Offline विजय वाठोरे सरसमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • विजय वाठोरे सरसमकर
नसीबवाल्यांच प्रेम
« on: June 25, 2015, 06:22:16 PM »
नसीबवाल्यांच प्रेम

आयुष्यात एकदा तरी
प्रेम करून पाहाव
जीव लावून मनापासून
दुसऱ्यासाठी जागून पहाव

प्रेम म्हणजे काय
प्रेमात जादू काय हेही पहाव
चुकून तरी एखादा क्षण
निदान दुसऱ्यासाठी जगाव

प्रेमात असतात कोणती नाती
क्षणभर हे तरी चाळाव
त्या वेड्या मन बोलायला
कोण प्रेरणा देत हे पहाव

जुन्या आणि नव्या आठवणी
आठवून पहाव
स्पर्शाने येणाऱ्या शहार्यांना 
अनुभवत  रहाव 

मन  गर्दीत असूनही
एकोपा शोधायला बघाव
उसळणाऱ्या त्या हृदयाच्या लहरींना
थांबवून पहाव

भविष्यकाळ बघता बघता
भूतकाळ आठवून पहाव
नशीबवाल्यांनाच मिळत हे प्रेम
म्हणून तरी करून पहाव

कवी :- विजय वाठोरे सरसमकर

Marathi Kavita : मराठी कविता