मुंबई नगरी
मुंबई, मुंबई महानगरी वाई वसली सागरी ,
तिथे भल्याभल्यांची घाई,
कोण कोणाला ओळखत नाही
कधी बॉम्ब स्फोट, कधी जाळपोळ,
सगळीकडे रडारड नि हाय हाय ,
सारे कष्ट करण्यात धुंद, रहाण्याची जागा अरुंद ,
कमाईचा सार्यांना छंद, वाटे सर्वांना आनंद,
तरीही आमची मुंबई सुंदर मुंबई,
सर्वांना हवीहवीशी वाटणारी मुंबई,
मिनिटाला लोकल गाडी
उभी राहते रोजच माडी,
सारे पाहुनी वाटते गोडी,
अशी आहे आमची मुंबई,
येतात सर्व या मुंबई नगरीत कमावाया पैसा,
जो तो बोलतो मुंबई आहे आमची माता,
थोर आहे माता मुंबई,
येथे राहत नाही कोण उपाशी,
म्हणून सारे म्हणतात,
अभिमानाने हि " आमची मुंबई "
आले किती तरी भूकंप व वारे वादळी
सुनामीने ओसाड केली हि जमीन सारी
तरी ताठ मानेने उभी राहिली " आमची मुंबई "
सौ. संजीवनी संजय भाटकर